'डॉक्टर आपल्या दारी' उपक्रम वर्षभर राबवणार
एकता दर्शन : 'शासन आपल्या दारी' या पार्श्वभूमीवर फलटण येथील डॉ.प्रसाद जोशी व जोशी हॉस्पिटल प्रा.लि.च्या वतीने 'डॉक्टर आपल्या दारी' हा उपक्रम वर्षभर राबविला जात आहे. या उपक्रमाचा पहिला कार्यक्रम फलटण नगरपालिकेत पार पडला.
'डॉक्टर आपल्या दारी' या अभिनव संकल्पनेत आनंदी व निरोगी कसे राहावे याविषयी मार्गदर्शन करणे, आरोग्य तपासणी, उपचार पद्धती आदी विषयांचा समावेश असून 'डॉक्टर आपल्या दारी' उपक्रम शासकीय कार्यालयांत वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे डॉ.प्रसाद जोशी यांनी यावेळी सांगितले.
'डॉक्टर आपल्या दारी' या उपक्रमाच्या पहिल्याच कार्यक्रमात फलटण नगरपालिकेतील सुमारे १५० कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, पालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
