महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर
पोंभूर्ले : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या ३२ व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे-देऊळवाडी ग्रामस्थ, जांभेकर कुटूंबिय यांच्या संयुक्त सहकार्याने ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७८ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली विशेष कार्यक्रम पोंभुर्ले, (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील दर्पण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ.सचिन सूर्यवंशी-बेडके, विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र सचिव सुरेश गोखले, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सादिक डोंगरकर, सुधाकर जांभेकर उपस्थित होते.
जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये श्रीकांत रामभाऊ साबळे (आवृत्ती संपादक, दै.पुण्यनगरी, पुणे), दिपक एस.शिंदे (आवृत्ती प्रमुख, दैनिक लोकमत, सातारा), नवनाथ कुताळ (प्रतिनिधी, दै.दिव्यमराठी, श्रीरामपूर), सौ.विमल विठ्ठलराव नलवडे (संपादिका, सा.धनसंतोष, कोरेगाव, जि.सातारा), अॅड.रोहित शामराव अहिवळे (संपादक, दै.गंधवार्ता, फलटण), यशवंत भिमराव खलाटे-पाटील (प्रतिनिधी, दै.पुण्यनगरी, फलटण) यांचा समावेश आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार डॉ.प्रमोद श्रीरंग फरांदे (वरिष्ठ उपसंपादक, दै.सकाळ, सातारा) व आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘दर्पण’ साहित्यिक पुरस्कार निर्मलकुमार सूर्यवंशी (रा.हडसणी, ता.हदगाव, जि.नांदेड) यांना प्रदान करण्यात येणार असून ६ जानेवारी २०२५ रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी जाहीर पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण होणार असल्याचे रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ.सचिन सूर्यवंशी-बेडके व शिरवली (माणगांव) येथील विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे सचिव सुरेश गोखले यांनी रविंद्र बेडकिहाळ यांच्या नेतृत्त्वात बाळशास्त्रींच्या स्मृती जपण्यासाठी सुरु असलेल्या कामाचे कौतुक केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त अमर शेंडे यांनी केले. कार्यक्रमास सौ.सुलभा गोखले, सौ.ज्योती सुर्यवंशी-बेडके, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त सौ.अलका बेडकिहाळ, रोहित वाकडे, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे संचालक प्रसन्न रुद्रभटे यांच्यासह विविध वृत्तपत्रातील पत्रकार, पोंभुर्ले गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
