आमदार जयकुमार गोरे आज काय बोलणार ; संपूर्ण तालुक्याचे लक्ष
भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माणचे आमदार जयकुमार गोरे यांची फलटण येथे आज सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार असल्याने या सभेत खासदार व आमदार काय बोलणार याकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचा फलटण तालुक्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपच्या वतीने संयुक्त दौरा आयोजित केला होता. दरम्यान फलटण तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय गावांचा झंझावाती दौरा करून स्थानिक ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
आज दोन दिवसांचा दौरा संपत असून सायंकाळी ५ वाजता फलटण येथील गजानन चौक येथे जाहीर सभा होणार असून या सभेत माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे काय बोलणार याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
