गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद : श्रीरंग काटेकर
फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत प्राप्त केलेले यश कौतुकास्पद असून त्यांच्या भावी आणि उज्ज्वल जीवनासाठी ते उपयुक्त आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकून राहण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे मत गौरीशंकरचे श्री. काटेकर यांनी व्यक्त केले. शैक्षणिक वर्ष सन २०२० आणि २१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंञशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष बी. फार्मसी परिक्षेत विशेष चमकदार कामगिरी करणाऱ्या काव्यश्री घोंगडे, स्नेहल कुंभार, आणि संकेत मेटकरी यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
लिंब (एकता दर्शन) : फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत प्राप्त केलेले यश कौतुकास्पद असून त्यांच्या भावी आणि उज्ज्वल जीवनासाठी ते उपयुक्त आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकून राहण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे मत गौरीशंकरचे श्री. काटेकर यांनी व्यक्त केले. शैक्षणिक वर्ष सन २०२० आणि २१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंञशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष बी. फार्मसी परिक्षेत विशेष चमकदार कामगिरी करणाऱ्या काव्यश्री घोंगडे, स्नेहल कुंभार, आणि संकेत मेटकरी यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी, उपप्राचार्य योगेश गुरव, डॉ. राहुल जाधव, डॉ. महेश थोरात, डॉ. संतोष बेल्हेकर, प्रा. धर्यशील घाडगे, प्रा. माधुरी मोहीते, निलेश पाटील, प्रशांत शेडगे आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांनी केलेली चमकदार कामगिरीने महविद्यालयाचा नावलैकिक वाढतोच शिवाय यशस्वी विद्यार्थ्याकडे पाहून इतर विद्यार्थी सुद्धा प्रेरित होतात. असे श्रीरंग काटेकर म्हणाले. प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले दर्जात्मक शिक्षण व गुणत्माक बाबीकडे आमचे नेहमीच लक्ष राहिले आहे. विद्यार्थी घटक हा संपूर्ण ज्ञानसंपन्न व त्याचबरोबरच उद्योग विश्वाच्या कामी आला पाहीजे. यासाठी आम्ही महाविद्यालय स्तरावर विशेष परिश्रम घेत असतो.
गौरीशंकर बी. फार्मसी लिंबच्या शैक्षणिक गुणवत्तेची पंरपरा अखंडपणे सुरू ठेवून काव्यश्री घोंगडे, स्नेहल कुमार, संकेत मेटकरी या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. त्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक जयवंतराव सांळुखे, आप्पा राजगे, डॉ. अनिरूध्द जगताप, प्रशासकिय अधिकारी नितीन मुडलगीकर यानी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार उपप्राचार्य योगेश गुरव यांनी मानले.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
